IPL 2023 Match 12, MI vs CSK Live Score Update: चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सनी केला पराभव, अजिंक्य रहाणेने खेळली तुफानी खेळी

मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर इशान किशनने सर्वाधिक 32 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून अष्टपैलू रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने 18.1 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.

आज IPL 2023 चा 12 वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. हा सामना मुंबईतील वानखेडेवर झाला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्स संघाचा सात गडी राखून पराभव केला. या मोसमातील मुंबई इंडियन्स संघाचा हा दुसरा पराभव आहे. तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 157 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर इशान किशनने सर्वाधिक 32 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून अष्टपैलू रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने 18.1 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. चेन्नई सुपर किंग्जच्या वतीने अजिंक्य रहाणेने धडाकेबाज खेळी करताना 61 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement