PBKS vs CSK, IPL 2024 Live Score Update: चेन्नईने पंजाबला दिले 168 धावांचे लक्ष्य, दुबे-धोनी शुन्यावर बाद, जडेजाने केल्या 43 धावा

चेन्नई सुपर किंग्जने या मोसमात 10 सामने खेळले आहेत. या कालावधीत सीएसकेने 5 सामने जिंकले आहेत. संघ 10 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्जने 10 पैकी केवळ 4 सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्ज 8 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.

PBKS vs CSK, IPL 2024: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 53 वा (IPL 2024) सामना पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज (PBKS vs CSK) यांच्यात हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला येथे खेळवला जात आहे. या मोसमात हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. चेन्नई सुपर किंग्जने या मोसमात 10 सामने खेळले आहेत. या कालावधीत सीएसकेने 5 सामने जिंकले आहेत. संघ 10 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्जने 10 पैकी केवळ 4 सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्ज 8 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम कुरनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या चेन्नईने पंजाबसमोर 168 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने सर्वाधिक 43 धावांची खेळी खेळली. पंजाब किंग्जकडून राहुल चहर आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement