Hasin Jahan: भारताचे नाव बदला, मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचे पंतप्रधान मोदींना आवाहन
हसीन जहाँने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याद्वारे तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना खास आवाहन केले आहे. हे आवाहन देशाचे नाव बदलण्याबाबत आहे.
टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) सध्या क्रिकेटमधून ब्रेकवर आहे. भारतीय संघाला आशिया चषक (Asia Cup 2022) खेळायचा आहे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत मोहम्मद शमीला स्थान मिळालेले नाही. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँबद्दल (Hasin Jahan) बोलायचे झाले तर ती खूप चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिची चर्चा होत आहे. हसीन जहाँने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याद्वारे तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना खास आवाहन केले आहे. हे आवाहन देशाचे नाव बदलण्याबाबत आहे. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, आमचा देश, आमचा आदर. माझे भारतावर प्रेम आहे आपल्या देशाचे नाव फक्त हिंदुस्थान किंवा भारत असावे. हसीन जहाँने पुढे लिहिले की, माननीय पंतप्रधान, माननीय गृहमंत्री यांना विनंती आहे की भारताचे नाव बदला, जेणेकरून संपूर्ण जग आपल्या देशाला भारत किंवा हिंदुस्थान म्हणू शकेल.