Captain Rohit Sharma Bowling: विश्वचषकानंतर रोहित शर्माने पुन्हा गोलंदाजीत आजमावला हात, एका षटकात दिल्या इतक्या धावा; पाहा व्हिडिओ

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने दोन षटके टाकली. रोहित शर्माने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 39वी आणि 41वी षटके टाकली. रोहितच्या दोन षटकांत एकूण 11 धावा झाल्या.

Photo Credit - X

IND vs SL 2nd ODI: भारत आणि श्रीलंका संघ रविवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आमनेसामने आले. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) वेगळ्या भूमिकेत दिसला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहित गोलंदाजीसाठी आला होता. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने दोन षटके टाकली. रोहित शर्माने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 39वी आणि 41वी षटके टाकली. रोहितच्या दोन षटकांत एकूण 11 धावा झाल्या. रोहितने पहिल्या षटकात सहा आणि दुसऱ्या षटकात पाच धावा दिल्या. रोहितच्या चेंडूवर श्रीलंकेच्या फलंदाजांनी सावध फलंदाजी केली आणि त्याच्या चेंडूवर एकही चौकार लागला नाही आणि दुहेरी आणि एकेरीसह फलंदाजांनी धावा केल्या.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)