ICC T20 Ranking: बाबर आझमला मागे टाकुन सूर्याची टी-20 क्रमवारीत मोठी झेप, रिझवानचीही खुर्ची धोक्यात
या भारतीय फलंदाजाने एका स्थानाने झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एडन मार्करामला मागे टाकले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) ताज्या आयसीसी क्रमवारीत (ICC T20 Ranking) मोठी झेप घेतली आहे. या भारतीय फलंदाजाने एका स्थानाने झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एडन मार्करामला मागे टाकले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने पहिल्या स्थानावर आपली पकड मजबूत केली आहे. मात्र, आता रिझवान आणि सुर्या यांच्यात 60 गुणांचे अंतर आहे आणि टी-20 विश्वचषकापूर्वी हे अंतर आणखी कमी होऊ शकते.
India and Pakistan stars among the big movers in the latest @MRFWorldwide ICC Men's T20I Player Rankings 🇮🇳 🇵🇰
Full story 👇
— ICC (@ICC) September 28, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 28, 2022 04:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

