IND vs SA 1st Test Day 3 Lunch Break: तिसऱ्या दिवशी लंचपर्यंत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 392/7, पहिल्या डावात घेतली 147 धावांची

लंच ब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिका संघाने 100 षटकांत 7 गडी गमावून 392 धावा केल्या आहेत. मार्को जॉन्सन 72 आणि कागिसो रबाडा 1 धावांसह खेळत आहे

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 66 षटकांत 5 गडी गमावून 256 धावा केल्या होत्या. अशा प्रकारे यजमान संघाची आघाडी 11 धावांपर्यंत वाढली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. डीन एल्गर 140 धावा करून नाबाद परतला. त्याचवेळी मार्को युनसेन 3 धावा करून क्रीजवर आहे. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने 2-2 विकेट घेतल्या. याआधी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, टीम इंडियाचा पहिला डाव 67.4 षटकात 245 धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियासाठी केएल राहुलने सर्वाधिक 101 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 5 बळी घेतले. लंच ब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिका संघाने 100 षटकांत 7 गडी गमावून 392 धावा केल्या आहेत. मार्को जॉन्सन 72 आणि कागिसो रबाडा 1 धावांसह खेळत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement