Team India Victory Celebration: मुरादाबादमध्ये वधू-वरांनी टीम इंडियाचा विजय खास स्टाईलमध्ये केला साजरा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा 37 वा सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव करत विजयी घोडदौड सुरू ठेवली.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा 37 वा सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव करत विजयी घोडदौड सुरू ठेवली. याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत 5 गडी गमावून 326 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 27.1 षटकांत केवळ 83 धावा करून अपयशी ठरला. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका वधू-वरांनी टीम इंडियाचा विजय अनोख्या पद्धतीने साजरा केला. वधू-वरांनी त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांसोबत टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विजय साजरा केला. वर म्हणाला, "हा माझ्यासाठी 'दुहेरी धमाका' आहे कारण आज माझे लग्न आहे आणि आज भारतानेही जिंकले आहे आणि विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे."
पाहा पोस्ट -
#WATCH | Uttar Pradesh: A bride and groom, along with their relatives and friends, celebrate the victory of Team India against South Africa, in Moradabad
"It is a 'double dhamaka' for me as today is my wedding and India has also won today and Virat Kohli has equalled Sachin… pic.twitter.com/andXVGrEko
— ANI (@ANI) November 5, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 05, 2023 10:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

