Shivam Dube Ruled Out: टीम इंडियाला मोठा झटका, बांगलादेशविरुद्ध शिवम दुबे टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूची लागली लाॅटरी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी त्याच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आणि सांगितले की तीन सामन्यांच्या मालिकेतून तो बाहेर पडला आहे. बोर्डाने सांगितले की, दुबेला पाठीचा त्रास आहे, त्यामुळे तो या मालिकेत भाग घेऊ शकणार नाही.

Shivam Dube Ruled Out: टीम इंडियाला मोठा झटका, बांगलादेशविरुद्ध शिवम दुबे टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूची लागली लाॅटरी
Shivam Dube And Tilak Verma (Photo Credit - BCCI)

IND vs BAN T20I Series 2024: बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका (IND vs BAN T20I Series 2024) सुरू होण्याच्या अवघ्या 24 तासांपूर्वी टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे. ग्वाल्हेरमधील सामन्यापूर्वी टीम इंडियाचा अष्टपैलू शिवम दुबे (Shivam Dube) दुखापतीमुळे बाहेर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी त्याच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आणि सांगितले की तीन सामन्यांच्या मालिकेतून तो बाहेर पडला आहे. त्याच्या जागी तिलक वर्माला मालिकेत संधी देण्यात आली आहे. बोर्डाने सांगितले की, दुबेला पाठीचा त्रास आहे, त्यामुळे तो या मालिकेत भाग घेऊ शकणार नाही. नुकताच टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाचा एक भाग असलेला शिवम दुबे हा देखील श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाचा एक भाग होता पण तिथे तो काही विशेष करू शकला नाही. असे असतानाही त्याला संघात स्थान मिळाले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 05, 2024 09:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).