IPL 2023: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, दिग्गज गोलंदाज कृष्णा IPL मधून बाहेर

प्रसिद्ध कृष्णा बरेच दिवस क्रिकेटपासून दूर होता. प्रसिद्ध कृष्णाने टीम इंडियासाठी शेवटचा सामना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता.

टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा गंभीर दुखापतीमुळे आगामी आयपीएलमधून बाहेर पडला आहे. राजस्थान रॉयल्सने ही माहिती दिली आहे. प्रसिद्ध कृष्णा बरेच दिवस क्रिकेटपासून दूर होता. प्रसिद्ध कृष्णाने टीम इंडियासाठी शेवटचा सामना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. तो जवळपास 6 महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या वर्षी, भारत अ संघाकडून खेळताना, प्रसिद्ध कृष्णाला पाठीला दुखापत झाली होती, त्यानंतर तो बाहेर पडला होता आणि दुखापतीतून सावरण्यात अपयशी ठरला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement