Naseem Shah Ruled Out of Asia Cup 2023: 'करो या मरो' सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, नसीम शाह आशिया कपमधून बाहेर

14 सप्टेंबर रोजी श्रीलंकेसोबत करो किंवा मरो सामना होत असताना, पाकिस्तान संघाला मोठा धक्का लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला आहे.

Naseem shah (Photo Credit - Twitter)

आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) मध्ये पाकिस्तानसाठी परिस्थिती ठीक नाही आहे. प्रथम, संघाला भारताविरुद्ध 228 धावांनी दारूण पराभव पत्करावा लागला होता, आता 14 सप्टेंबर रोजी श्रीलंकेसोबत करो किंवा मरो सामना होत असताना, पाकिस्तान संघाला मोठा धक्का लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान नसीमच्या खांद्याला दुखापत झाली आणि वैद्यकीय समितीकडून त्याच्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या आशिया कप संघात नसीम शाहच्या जागी जमान खानचा समावेश करण्यात आला आहे.

Naseem Shah ruled out of Asia Cup 2023. pic.twitter.com/QJxBjzm3Jn

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement