NZ vs PAK 2nd ODI 2025: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का; मार्क चॅपमन संघाबाहेर, 'या' खेळाडूला स्थान

न्यूझीलंडचा मार्क चॅपमन पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला आहे. हा सामना २ एप्रिल रोजी हॅमिल्टनच्या सेडन पार्क येथे खेळला जाईल.

PC-X

NZ vs PAK 2nd ODI 2025: न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू मार्क चॅपमन (Mark Chapman) पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला आहे. हा सामना 2 एप्रिल रोजी हॅमिल्टनमधील सेडन पार्क येथे खेळला जात आहे. मार्क चॅपमनने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 111 चेंडूत 132 धावा केल्या होत्या. ही धावसंख्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली आहे. उत्तम खेळीच्या जोरावर सामन्यात मार्क चॅपमनला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणूनही सन्मानीत करण्यात आले. पण आता तो दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर आहे. चॅपमनला उजव्या पायाच्या दुखापत झाली. त्यामुळे तो विश्रांतीवर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement