IND vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, डेव्हिड वॉर्नर उर्वरित दोन कसोटींमधून बाहेर

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमधून बाहेर पडला आहे. दिल्लीत खेळल्या गेलेल्या कसोटीत वॉर्नरला दुखापत झाली होती.

IND vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, डेव्हिड वॉर्नर उर्वरित दोन कसोटींमधून बाहेर
डेविड वॉर्नर (Photo Credit: PTI)

भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान (Border-Gavaskar Trophy 2023) ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमधून बाहेर पडला आहे. दिल्लीत खेळल्या गेलेल्या कसोटीत वॉर्नरला दुखापत झाली होती. वॉर्नरची दुखापत गंभीर असून उपचारासाठी त्याला मायदेशी परतावे लागणार आहे. वॉर्नरच्या जागी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अद्याप घोषणा केलेली नाही. (हे देखील वाचा: IND vs AUS 3rd Test: इंदूरच्या होळकर स्टेडियमवर कांगारू संघ येणार अडचणीत, टीम इंडियाच्या नावावर आहे शानदार रेकाॅर्ड)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 21, 2023 12:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).