Rishabh Pant वर मोठी कारवाई, स्लो ओव्हर रेटमुळे पुढील सामन्यातून बाहेर

7 मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी त्याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे आणि 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Rishabh Pant (Photo Credit - X)

Rishabh Pant Suspended: इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या 62 व्या सामन्यात (IPL 2024) रविवारी दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (DC vs RCB) होणार आहे. या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) स्लो ओव्हर रेटमुळे आरसीबीविरुद्धचा पुढील सामना खेळू शकणार नाही. 7 मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी त्याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे आणि 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्याच्या 20 व्या षटकाच्या आधी, डीसी गेममध्ये 10 मिनिटे मागे होता. दिल्ली कॅपिटल्सने या मोसमात तिसऱ्यांदा हा गुन्हा केला आहे. अशा परिस्थितीत ऋषभ पंतवर कारवाई करण्यात आली आहे. पंत व्यतिरिक्त संघातील उर्वरित खेळाडूंना 12 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 50 टक्के (जे कमी असेल) दंड ठोठावण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)