2023 Men’s FIH Hockey World Cup: सामन्यापूर्वी टीम इंडियाची नवी जर्सी आली समोर, मनप्रीत सिंहने फोटो सोशल मीडियावर केला शेअर

दुसरीकडे, टीम इंडिया उद्या राउरकेला येथे स्पेनविरुद्ध संध्याकाळी 7 वाजता पहिला सामना खेळणार आहे. विश्वचषकाच्या पहिल्या दिवशी एकूण चार सामने खेळवले जाणार आहेत.

Hockey Team India New Jersey (Photo Credit - Twitter)

Hockey Team India New Jersey: हॉकी पुरुष विश्वचषक 2023 उद्यापासून म्हणजेच 13 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्याचा पहिला सामना अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात भुवनेश्वरमध्ये होणार आहे. दुसरीकडे, टीम इंडिया उद्या राउरकेला येथे स्पेनविरुद्ध संध्याकाळी 7 वाजता पहिला सामना खेळणार आहे. विश्वचषकाच्या पहिल्या दिवशी एकूण चार सामने खेळवले जाणार आहेत. विश्वचषकापूर्वी भारतीय हॉकी संघाला नवी जर्सी मिळाली आहे. मनप्रीत सिंहने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर हँडलवर नवीन जर्सीचा फोटो शेअर केला आहे. यावर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement