Team India Fitness Test: आशिया चषकापूर्वी खेळाडूंच्या फिटनेसवर बीसीसीआयचा भर, विराट, रोहितसह सर्वांची होणार विशेष चाचणी

वेस्ट इंडिज दौऱ्यावरून परतलेल्या आणि आयर्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत खेळत नसलेल्या खेळाडूंना 13 दिवसांचा कार्यक्रम पाळण्यास सांगण्यात आले.

रोहित शर्मा, विराट कोहली (Photo Credit: PTI)

Asia Cup 2023: आशिया कप 2023 (Asia Cup 2023) साठी श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीसह (Virat Kohli) इतर अव्वल खेळाडूंची फिटनेस चाचणी घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये रक्तासह संपूर्ण शरीराची चाचणी केली जाईल. कारण बीसीसीआयला (BCCI) खेळाडूंच्या फिटनेसबाबत कोणताही धोका पत्करायचा नव्हता. आशिया चषक 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावरून परतलेल्या आणि आयर्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत खेळत नसलेल्या खेळाडूंना 13 दिवसांचा कार्यक्रम पाळण्यास सांगण्यात आले. ज्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, अष्टपैलू हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंचा समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)