बीसीसीआयचे अध्यक्ष Roger Binny आणि Rajiv Shukla आशिया कपसाठी पाकिस्तानला जाणार, वाघा बॉर्डरमार्गे लाहोरला पोहचणार
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना आशिया चषकासाठी पाकिस्तानला भेट देण्याचे आमंत्रण पाठवले होते. चेअरमन रॉजर बिन्नी (Roger Binny) आणि व्हाईस चेअरमन राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी तो स्वीकारला आहे.
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ (PAK vs NEP) यांच्यात मुलतान येथे होणार आहे. सलामीच्या सामन्यासह एकूण 4 सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जातील, इतर सामने श्रीलंकेत होतील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना आशिया चषकासाठी पाकिस्तानला भेट देण्याचे आमंत्रण पाठवले होते. चेअरमन रॉजर बिन्नी (Roger Binny) आणि व्हाईस चेअरमन राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी तो स्वीकारला आहे. वृत्तानुसार, ते पाकिस्तानमध्ये होणारे सामनेही पाहणार आहे. पीटीआयने एका सूत्राचा हवाला देत आपल्या वृत्तात म्हटले आहे की बीसीसीआयचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव जय शाह 2 सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामन्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहतील. यानंतर बिन्नी आणि राजीव पाकिस्तानला जाणार आहेत.