BCCI gave a Check of 125 Crores to Team India: बीसीसीआयने टीम इंडियाला दिला 125 कोटींचा धनादेश, संपूर्ण स्टेडियममध्ये जल्लोषाचे वातावरण (Watch Video)
नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपनडेक बसमध्ये भारतीय संघाची विजयी मिरवणुक सुरु झाली असुन ते मरीन ड्राइव्हवरून वानखेडे स्टेडियमला पोहचले. त्याचवेळी वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा गौरव करण्यात आला.
Team India Victory Parade: टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जून रोजी खेळला गेला. या सामन्यात भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा सात धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषक विजेतेपदावर कब्जा केला. टीम इंडियाचे मायदेशात सकाळी भारतात जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवुन दिल्लीहून मुंबईत पोहोचली. नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपनडेक बसमध्ये भारतीय संघाची विजयी मिरवणुक सुरु झाली असुन ते मरीन ड्राइव्हवरून वानखेडे स्टेडियमला पोहचले. त्याचवेळी वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा गौरव करण्यात आला. बीसीसीआयने टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्यांच्या गजरात टीम इंडियाने चाहत्यांचे आभार मानले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)