Rishabh Pant Fined INR 24 Lakhs: BCCI ने ऋषभ पंतला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला, हंगामातील दुसरी स्लो ओव्हर रेट

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतला स्लो ओव्हर रेटसाठी 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला.

Rishabh Pant (Photo Credit - X)

वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सला (LSG’) मुंबई इंडियन्सकडून 54 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर लखनौचा कर्णधार ऋषभ पंतला (Rishabh Pant) आणखी एक धक्का बसला. बीसीसीआयने (BCCI) पंतला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला. लखनौ संघाच्या स्लो ओव्हर रेटमुळे त्याला हा दंड ठोठावण्यात आला. जो या हंगामात लखनौ सुपर जायंट्स संघाचा दुसरा उल्लंघन होता. त्याशिवाय, लखनौ सुपर जायंट्स संघाला सामना शुल्काच्या 25 टक्के रक्कम भरावी लागेल.

 ऋषभ पंतला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement