Women Cricket Team Head Coach: 'धाकड खेळाडू' महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी, बीसीसीआयने दिली मान्यता
मजुमदार यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नसली तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटच्या 171 सामन्यांमध्ये 30 शतकांसह 11,000 पेक्षा जास्त प्रथम श्रेणी धावा केल्या.
भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये नाव कमावणाऱ्या अमोल मजुमदार (Amol Muzumdar) यांची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI) बुधवारी ही घोषणा केली. मजुमदार यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नसली तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटच्या 171 सामन्यांमध्ये 30 शतकांसह 11,000 पेक्षा जास्त प्रथम श्रेणी धावा केल्या. त्याच्या 21 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याने 100 हून अधिक लिस्ट ए आणि 14 टी-20 सामने खेळले. मजुमदार यांनी मुंबईसह अनेक रणजी विजेतेपद पटकावले. पुढे ते आसाम आणि आंध्र प्रदेशकडूनही खेळले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)