IND vs BAN T20 WC 2024 Super 8 Toss Update: बांगलादेशने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकली, भारताला फलंदाजीसाठी केले अंमत्रित

याआधी बांगलादेशला ऑस्ट्रेलियाविरुद्द पराभव स्वीकारावा लागला आहे. तर दुसरीकडे, भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावाच लागेल.

IND vs BAN (Photo Credit - X)

IND vs BAN T20 WC 2024 Super 8: टी-20 विश्वचषकात आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. हा सामना अँटिग्वा येथील नॉर्थ साऊंड सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. याआधी बांगलादेशला ऑस्ट्रेलियाविरुद्द पराभव स्वीकारावा लागला आहे. तर दुसरीकडे, भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावाच लागेल. त्याचबरोबर बांगलादेशचा संघही उलेटफेरमध्ये माहीर आहे. दरम्यान, बांगलादेश नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (पंत), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शकीब अल हसन, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, महेदी हसन, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement