IND vs BAN 1st Test Day 4 Live Update: बांगलादेशची 173 धावांवर पडली तिसरी विकेट, कुलदीपने लिटन दासला केले बाद

स्पर्धेचा आज चौथा दिवस आहे. बांगलादेशला विजयासाठी 340 धावांची गरज आहे. त्याचबरोबर भारताला 7 विकेट्स मिळवून सामना जिंकण्याची इच्छा आहे.

Kuldeep Yadav (Photo Credit - Twitter)

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळवला जात आहे. स्पर्धेचा आज चौथा दिवस आहे. बांगलादेशला विजयासाठी 340 धावांची गरज आहे. त्याचबरोबर भारताला 7 विकेट्स मिळवून सामना जिंकण्याची इच्छा आहे. भारताने पहिल्या डावात 404 धावा केल्या होत्या आणि 2 बाद 258 धावा करून दुसरा डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात बांगलादेशने पहिल्या डावात 150 धावा केल्या तर दुसऱ्या डावात 173 धावांवर बांगलादेशची तिसरी विकेट पडली. कुलदीप यादवने लिटन दासला बाद केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement