BAN vs PAK: पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदीला ICC चा दणका, T20 सामन्यात बांगलादेशी फलंदाजाविरुद्ध केलेल्या कृतीने दंड ठोठावला
शाहीनच्या अनावश्यक आक्रमक वर्तनाचा पाकिस्तान संघ व्यवस्थापन किंवा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चांगला प्रतिसाद दिला नाही आणि वेगवान गोलंदाजाला अफिफची ताबडतोब माफी मागावी असे सांगण्यात आले.
पाकिस्तानचा (Pakistan) वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला (Shaheen Afridi) यंदा आठवड्याच्या सुरुवातीला ढाका (Dhaka) येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यादरम्यान बांगलादेशचा (Bangladesh) फलंदाज अफिफ हुसेनवर (Afif Hussain) चेंडू फेकल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, आफ्रिदीच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला आहे. आफ्रिदीची 24 महिन्यांच्या कालावधीत हा पहिला गुन्हा होता.
शाहीन शाह आफ्रिदीचा थ्रो
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)