Babar Azam Resign From PAK Captaincy: विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीमुळे बाबर आझमचा मोठा निर्णय, सर्व फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडण्याचा घेतला निर्णय

बाबर आझम संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड काही मोठा निर्णय घेईल, अशी अटकळ सातत्याने लावली जात होती. आता बुधवारी, 15 नोव्हेंबर रोजी, पाकिस्तानी क्रिकेटपटूने ट्विटरवर एक पत्र जारी केले आणि सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला.

Babar Azam Resign From PAK Captaincy: विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीमुळे बाबर आझमचा मोठा निर्णय, सर्व फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडण्याचा घेतला निर्णय
Babar Azam (Photo Credit - Twiter)

विश्वचषक 2023 मधील संघाच्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) आता मोठे पाऊल उचलले आहे. बाबर आझम संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड काही मोठा निर्णय घेईल, अशी अटकळ सातत्याने लावली जात होती. आता बुधवारी, 15 नोव्हेंबर रोजी, पाकिस्तानी क्रिकेटपटूने ट्विटरवर एक पत्र जारी केले आणि सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्याने आपल्या कर्णधारपदाच्या काळात संघाला नंबर 1 वनडे संघ बनवल्याचाही उल्लेख केला. बाबर आझमने आपल्या X हँडलवर पोस्ट करताना पत्र शेअर केले आणि त्यात लिहिले, 'मला आठवते जेव्हा मला 2019 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. या चार वर्षांत अनेक चढ-उतार आले. मात्र, क्रिकेट जगतात पाकिस्तानच्या सन्मानाला कधीही धक्का पोहोचू नये, हे एकच ध्येय माझ्या मनात होते. व्हाईट बॉल फॉरमॅट (ODI) मध्ये नंबर वन टीम बनणे हे सर्व प्रशिक्षक, खेळाडू आणि टीम स्टाफच्या मेहनतीचे फळ होते. मी सर्व चाहत्यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो.' (हे देखील वाचा: Sachin React To Virat Kohli 50th Century: विराटच्या 50व्या शतकावर सचिनची प्रतिक्रिया, विक्रम मोडल्याबद्दल 15 वर्ष जुनी गोष्ट सांगितली)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 15, 2023 08:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).