Pakistan Squad For 2nd and 3rd Test: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, बाबर आझम आणि नसीम शाहनां बाहेरचा रस्ता

पहिल्या सामन्यातील दारूण पराभवानंतर संघाने माजी कर्णधार बाबर आझम, वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांना संघातून बाहेर काढून सर्वांनाच चकित केले आहे. बाबर कारकिर्दीत प्रथमच फॉर्ममुळे बाहेर आहे.

Pakistan Squad For 2nd and 3rd Test: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, बाबर आझम आणि नसीम शाहनां बाहेरचा रस्ता
PAK Team (Photo Credit - X)

PAK vs ENG 2nd And 3rd Test Squad: पाकिस्तान क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा केली आहे. पहिल्या सामन्यातील दारूण पराभवानंतर संघाने माजी कर्णधार बाबर आझम, वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांना संघातून बाहेर काढून सर्वांनाच चकित केले आहे. बाबर कारकिर्दीत प्रथमच फॉर्ममुळे बाहेर आहे. यासोबतच अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज सरफराज अहमदलाही संघातून वगळण्यात आले आहे. पाकिस्तान संघाच्या निवडकर्त्यांनी हसीबुल्लाह, मेहरान मुमताज, कामरान गुलाम आणि मोहम्मद अली या नव्या खेळाडूंचा संघात समावेश केला आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तान संघ: शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसिबुल्लाह (विकेटकीपर), कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद. रिझवान (विकेटकीपर), नोमान अली, सैम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा आणि जाहिद महमूद.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2024 06:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).