Pakistan: स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पाकिस्तानच्या नामांकित खेळाडूंना 'या' पुरस्काराने सन्मानित
बाबरला देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार सितारा-ए-पाकिस्तानने सन्मानित करण्यात आले आहे.
पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक बाबर आझम (Babar Azam) सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहे. पाकिस्तान पुरुष संघाचा कर्णधार बाबर वनडे आणि टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थानावर राहणारा तो सध्या जागतिक क्रिकेटमधील एकमेव क्रिकेटपटू आहे. 27 वर्षीय बाबर सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाला आता 16 ऑगस्टपासून नेदरलँड्ससोबत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेपूर्वी बाबरला देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार सितारा-ए-पाकिस्तानने सन्मानित करण्यात आले आहे. बाबरशिवाय पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार बिस्माह मारूफ हिला तमगा-ए-पाकिस्तान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर अंध क्रिकेटपटू मसूद जानला प्राईड ऑफ परफॉर्मन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) या तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)