IND vs AUS 3rd Test Day 2 Live Score Updates: ऑस्ट्रेलियाची सहावी विकेट पडली, कॅमेरून ग्रीन 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला

चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे.

IND vs AUS (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 चा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. या ट्रॉफीचा हा 16वा हंगाम 10व्यांदा भारतीय भूमीवर खेळला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नागपूर आणि दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 54 षटकांत 4 गडी गमावून 156 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना टीम इंडिया 33.2 षटकात अवघ्या 109 धावांवर आटोपली. टीम इंडियाकडून विराट कोहलीने सर्वाधिक 22 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुहनमनने सर्वाधिक 5 बळी घेतले. पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला सहावा मोठा धक्का बसला. कॅमेरून ग्रीन 21 धावा करून उमेश यादवचा बळी ठरला. ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 188/6.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif