Aaron Finch Retirement: टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाज आरोन फिंचची वनडेतून निवृत्तीची घोषणा

आरोन फिंचनं त्याच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 145 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय.

आरोन फिंच (Photo Credit: PTI)

ऑस्ट्रेलियन सलामीवीर आरोन फिंचने (Aaron Finch Retirement) रविवारी केर्न्समध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या वनडेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषकात तो टी-20 संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. आरोन फिंचनं 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आरोन फिंचनं त्याच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 145 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. ज्यात त्यानं 39.14 च्या सरासरीनं 5 हजार 401 धावा केल्या आहेत. ज्यात 17 शतकांचा सामावेश आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या