Australia Wins WTC Final 2023: ऑस्ट्रेलियाने डब्लूटीसी विजेतेपद पटकावले, आयसीसी स्पर्धेत टीम इंडियाचा आणखी एक लाजिरवाणा पराभव

दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर खेळला गेला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 212 धावांनी पराभव करत WTC च्या दुसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले. मॅचच्या पाचव्या दिवशी टीम इंडिया उरलेल्या 280 रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली, पण टीम 63.3 ओव्हरमध्ये 234 रन्सवर गारद झाली.

Australia Wins WTC Final 2023: ऑस्ट्रेलियाने डब्लूटीसी विजेतेपद पटकावले, आयसीसी स्पर्धेत टीम इंडियाचा आणखी एक लाजिरवाणा पराभव

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना (WTC Final 2023) आज टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर खेळला गेला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 212 धावांनी पराभव करत WTC च्या दुसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले. मॅचच्या पाचव्या दिवशी टीम इंडिया उरलेल्या 280 रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली, पण टीम 63.3 ओव्हरमध्ये 234 रन्सवर गारद झाली. टीम इंडियाकडून विराट कोहलीने सर्वाधिक 49 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव 121.3 षटकात 449 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 163 धावा केल्या. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने पॅट कमिन्सची विकेट पडताच 270 धावांवर डाव घोषित केला. त्याचवेळी, पहिल्या डावात टीम इंडिया 69.4 षटकात केवळ 296 धावा करत ऑलआऊट झाली. टीम इंडियाकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 89 धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2023 05:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).