AUS vs SL, T20 World Cup 2021: डेविड वॉर्नरचे तुफानी अर्धशतक, ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 7 विकेटने दणदणीत विजय
ऑस्ट्रेलियाने T20 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला आणि उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या शक्यता आणखी मजबूत केल्या. सलामीवीर डेविड वॉर्नरचे 42 चेंडूत धमाकेदार 65 धावांचे अर्धशतकी खेळी आणि कर्णधार आरोन फिंचच्या 23 चेंडूत 37 धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे कांगारू संघाने 17 षटकांत 155 धावांचे लक्ष्य पार केले.
ऑस्ट्रेलियाने (Australia) टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत श्रीलंकेचा (Sri Lanka) 7 गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला आणि उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या शक्यता आणखी मजबूत केल्या. सलामीवीर डेविड वॉर्नरचे (David Warner) 42 चेंडूत धमाकेदार 65 धावांचे अर्धशतकी खेळी आणि कर्णधार आरोन फिंचच्या (Aaron Finch) 23 चेंडूत 37 धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे कांगारू संघाने 17 षटकांत 155 धावांचे लक्ष्य पार केले. अखेरीस स्टीव्ह स्मिथ 26 चेंडूत 28 आणि मार्कस स्टॉइनिस 7 चेंडूत 16 धावांवर नाबाद परतले.
Two in two for Australia ✌️
#T20WorldCup | #AUSvSL | https://t.co/amKqUyfDGR pic.twitter.com/oZSRSHJs55
— ICC (@ICC) October 28, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 28, 2021 11:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

