Asia Cup 2023 Final: बीसीसीआय सचिव जय शाह यांची मोठी घोषणा, श्रीलंकेच्या ग्राउंडस्टाफला मिळणार 42 लाखांचे रोख बक्षीस

आशिया कप 2023 चा अंतिम सामना आज भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला 8व्यांदा विजेतेपद मिळवायचे आहे. तर 6 वेळचा चॅम्पियन श्रीलंका आपल्या विजेतेपदाचे रक्षण करण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जय शाह यांनी श्रीलंकेच्या मैदानावरील कर्मचाऱ्यांसाठी 42 लाखांचे रोख बक्षीस जाहीर केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement