Asia Cup 2022: सुपर 4 सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एक विकेटने केला पराभव; भारत आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतून बाहेर

पाकिस्तानला शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती आणि त्यांच्या 9 विकेट पडल्या होत्या, पण नसीम शाहने दोन चेंडूत दोन षटकार ठोकले आणि पाकिस्तानने हा सामना आपल्या नावावर केला.

Asia Cup 2022

आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये पाकिस्तानने रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानचा एका विकेटने पराभव केला. यासह भारत आशिया कपमधून बाहेर पडला आहे. अंतिम फेरीत पाकिस्तानचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. मात्र, भारताला सुपर 4 चा पुढील सामना गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. अंतिम फेरी गाठण्याच्या भारताच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी, आज अफगाणिस्तानचा विजय आवश्यक होता. शेवटच्या षटकापर्यंत असेच दिसत होते. पाकिस्तानला शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती आणि त्यांच्या 9 विकेट पडल्या होत्या, पण नसीम शाहने दोन चेंडूत दोन षटकार ठोकले आणि पाकिस्तानने हा सामना आपल्या नावावर केला. आता आशिया चषक 2022 चा अंतिम सामना रविवारी (11 सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)