Ashes 2021: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू Ben Stokes लवकरच करणार पुनरागमन; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस मालिकेतील संघात समाविष्ट
स्टोक्सचा अॅशेससाठीच्या इंग्लंड संघात समावेश करण्यात आला असून तो 4 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.
इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स लवकरच क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) वैद्यकीय संघाने स्पष्ट केले आहे की स्टोक्स पुन्हा सराव सुरू करू शकतो. सुमारे पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर स्टोक्स पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस मालिकेत परतणार आहे. दुखापती आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्टोक्सने क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. स्टोक्सचा अॅशेससाठीच्या इंग्लंड संघात समावेश करण्यात आला असून तो 4 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)