KS Bharat Trolled: एक झेल सोडताच केएस भरत सोशल मीडियावर ट्रोल, कामरान अकमलशी होऊ लागली तुलना

केएस भरतने संपूर्ण मालिकेत जास्त धावा केल्या नाहीत आणि आजच्या सुरुवातीला त्याचा एक झेल सोडला.

भारताचा यष्टिरक्षक श्रीकर भरत (KS Bharat) हा आज अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 (Border-Gavaskar Trophy 2023) कसोटी सामन्याच्या (IND vs AUS 4th Test) पहिल्या 30 मिनिटांत अत्यंत वाईट विकेटकीपिंग करताना दिसला. केएस भरतने संपूर्ण मालिकेत जास्त धावा केल्या नाहीत आणि आजच्या सुरुवातीला त्याचा एक झेल सोडला आणि त्याच्यामुळे विकेटच्या मागे ऑस्ट्रेलियाच्या खात्यात काही अतिरिक्त धावाही जमा झाल्या. कर्णधार रोहित शर्मा याआधीही भरताच्या समर्थनार्थ बोलले आहे, मात्र आता त्याच्या जागी इशान किशनची निवड न केल्याबद्दल चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तसेच झेल सोडल्यामुळे भरतला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement