Arshdeep Singh County Debut: अर्शदीप सिंग काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचला इंग्लंडला, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सरेविरुद्ध रविवारपासून सुरू होणाऱ्या सामन्यात अर्शदीप निवडीसाठी उपलब्ध असेल. इंग्लंडला पोहोचल्यानंतर त्याने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या वर्षी मार्चमध्ये अर्शदीप सिंगने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पाच सामने खेळण्यासाठी केंटसोबत करार केला होता.

Arshdeep Singh (Photo credit - Twitter)

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) या हंगामातील काउंटी चॅम्पियनशिपच्या पाच सामन्यांमध्ये भाग घेण्यासाठी इंग्लंडला पोहोचला असून तो कौंटी संघ केंटमध्ये सामील झाला आहे. सरेविरुद्ध रविवारपासून सुरू होणाऱ्या सामन्यात अर्शदीप निवडीसाठी उपलब्ध असेल. इंग्लंडला पोहोचल्यानंतर त्याने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या वर्षी मार्चमध्ये अर्शदीप सिंगने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पाच सामने खेळण्यासाठी केंटसोबत करार केला होता. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात अर्शदीपची दमदार कामगिरी लक्षात घेऊन केंटने हा करार केला. टी-20 विश्वचषकात अर्शदीपने 15.60 च्या सरासरीने 10 विकेट घेतल्या. 24 वर्षीय अर्शदीपने 2021 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत आपली क्षमता सिद्ध केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement