GT vs MI, IPL 2023 Qualifier 2 Live Score Update: गुजरात टायटन्स संघाला दुसरा धक्का, सलामीवीर शुभमन गिल 129 धावा करुन बाद

दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी (Ahmedabad's Narendra Modi Stadium) स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांना अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो किंवा मरो असा असेल.

GT vs MI, IPL 2023 Qualifier 2 Live Score Update: गुजरात टायटन्स संघाला दुसरा धक्का, सलामीवीर शुभमन गिल 129 धावा करुन बाद
शुभमन गिल (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग 2023 चा (IPL 2023) दुसरा क्वालिफायर आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी (Ahmedabad's Narendra Modi Stadium) स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांना अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो किंवा मरो असा असेल. यामध्ये जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल आणि चेन्नईसोबत खेळेल. पराभूत संघाचा प्रवास तिथेच संपेल. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना गुजरात संघाला दुसरा धक्का बसला आहे. गुजरातचा स्कोर 197/2

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 26, 2023 09:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).