Asia Cup 2022: जडेजानंतर टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का, आवेश खान आजारपणामुळे आशिया कपमधून बाहेर

इंडियन प्रीमियर लीगमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर आवेश खानची भारताने निवड केली होती, तथापि, आशिया चषक स्पर्धेत तो चांगली कामगिरी करू शकला नाही.

Avesh Khan (Photo Credit - Twitter)

आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मध्ये भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या दुखापतीनंतर आता वेगवान गोलंदाज आवेश खान (Avesh Khan) आजारपणामुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याचवेळी त्याच्या जागी दीपक चहरचा संघात समावेश करण्यात आला आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर आवेश खानची भारताने निवड केली होती, तथापि, आशिया चषक स्पर्धेत तो चांगली कामगिरी करू शकला नाही. या वेगवान गोलंदाजाने पाकिस्तानविरुद्ध फक्त दोन सामने खेळले आणि एक विकेट घेतली. मात्र, त्याने हाँगकाँगविरुद्ध चांगली कामगिरी केली. पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडलेल्या चहरने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात पुनरागमन करत चांगली कामगिरी करून दाखवली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)