Sachin Tendulkar And Virat Kohli Connection: विराट कोहलीचे शतका सोबत जुळुन आला आश्चर्यकारक योगायोग, सचिन तेंडुलकरशी आहे खास संबंध; Watch Video

विराट कोहलीचे हे शतक हा एक अद्भुत योगायोग आहे. 2002 मध्ये, टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने क्वीन्स पार्क ओव्हल येथे 29 वे कसोटी शतक झळकावले. तब्बल 21 वर्षांनंतर म्हणजेच 2023 मध्ये, विराट कोहलीने क्वीन्स पार्क ओव्हलवर त्याचे 29 वे कसोटी शतकही झळकावले.

Sachin Tendulkar And Virat Kohli Connection: विराट कोहलीचे शतका सोबत जुळुन आला आश्चर्यकारक योगायोग, सचिन तेंडुलकरशी आहे खास संबंध; Watch Video

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील 2 कसोटी मालिकेतील दुसरा सामना क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने पहिला सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. दुसऱ्या दिवशीही खेळ सुरूच आहे. दरम्यान, टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्रिनिदाद कसोटीत शानदार शतक झळकावले. विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध 121 धावांची शानदार खेळी केली होती. त्याचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 76 वे शतक होते. विराट कोहलीचे हे शतक हा एक अद्भुत योगायोग आहे. 2002 मध्ये, टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने क्वीन्स पार्क ओव्हल येथे 29 वे कसोटी शतक झळकावले. तब्बल 21 वर्षांनंतर म्हणजेच 2023 मध्ये, विराट कोहलीने क्वीन्स पार्क ओव्हलवर त्याचे 29 वे कसोटी शतकही झळकावले.

पहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 21, 2023 11:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).