एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 16 वा (ICC Cricket World Cup 2023) सामना आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान (NZ vs AFG) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम खेळताना किवी संघाने निर्धारित 50 षटकात 6 गडी गमावून 288 धावा केल्या होत्या. ग्लेन फिलिप्सच्या 71 आणि कर्णधार टॉम लॅथमच्या शानदार 68 धावांमुळे संघ संकटातून बाहेर पडला आणि इथपर्यंत पोहोचला. यानंतर गोलंदाजांनी अफगाणिस्तानला सुरुवातीचे धक्के दिले. यापैकी एक कर्णधार हशमतुल्ला शाहिदीची विकेट होती, त्याला मिचेल सँटनरने अप्रतिम झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतवले. आयसीसीने सँटनरच्या या झेलचा व्हिडिओही शेअर केला आणि त्याला कॅच ऑफ द टूर्नामेंटचा स्पर्धक म्हणून घोषित केले. सँटनरने त्याच्या मागे धावत उडी मारली आणि एका हाताने झेल पकडला.

पाहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)