IND vs AUS 4th Test: अक्षर पटेलने ट्रॅव्हिस हेडला बोल्ड करत कसोटी क्रिकेटमधील विकेटचे अर्धशतक केले पूर्ण
त्याने 60 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडला बोल्ड केले. 163 चेंडूंत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 90 धावा करून हेड बाद झाला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. स्पर्धेचा आज पाचवा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 571 धावा करत 91 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरूच आहे. अशा परिस्थितीत हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता खूप जास्त आहे. दरम्यान, अक्षर पटेलने अखेर भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्याने 60 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडला बोल्ड केले. 163 चेंडूंत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 90 धावा करून हेड बाद झाला. अक्षर पटेलनेही हेड विकेट घेत कसोटी क्रिकेटमधील विकेटचे अर्धशतक पूर्ण केले. हेडच्या जागी स्टीव्ह स्मिथ फलंदाजीला आला. अक्षर पटेलने 2205 चेंडूत 50 कसोटी बळी पूर्ण केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)