Ajit Agarkar यांनी टीम इंडियाच्या मुख्य निवडकर्ता पदासाठी केला अर्ज

अजित आगरकर यांनी यापूर्वी 2021 साठी बीसीसीआयमध्ये मुख्य निवडकर्ता पदासाठी अर्ज केला होता. मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या असहकारामुळे त्यांची या पदासाठी निवड झाली नाही.

Ajit Agarkar (Photo Credit - Twitter)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाच्या निवड समितीमधील रिक्त जागेसाठी अर्ज मागवले होते. त्याचवेळी भारताचा माजी खेळाडू अजित आगरकरने (Ajit Agarkar) या पदासाठी अर्ज केला आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, आगरकरने आता आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सपासून वेगळे झाल्यानंतर या पदासाठी अर्ज केला आहे. दिल्ली कॅपिटल्सने पुष्टी केली की आगरकर आणि शेन वॉटसन आता सपोर्ट स्टाफचा भाग नाहीत. अजित आगरकर यांनी यापूर्वी 2021 साठी बीसीसीआयमध्ये मुख्य निवडकर्ता पदासाठी अर्ज केला होता. मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या असहकारामुळे त्यांची या पदासाठी निवड झाली नाही. विशेष म्हणजे 45 वर्षीय आगरकरने टीम इंडियासाठी 26 कसोटी, 191 वनडे आणि 4 टी-20 सामने खेळले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement