Ajinkya Rahane Double Century Duleep Trophy: विराट कोहलीपाठोपाठ अजिंक्य रहाणेही चमकला, दुलीप ट्रॉफीत ठोकले द्विशतक

दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतून त्याला वगळण्यात आले होते. अजिंक्य रहाणेने यशस्वी जैस्वालसह दुसऱ्या विकेटसाठी 333 धावांची भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.

Ajinkya Rahane (Photo Credit - Twitter)

टीम इंडियाच्या (Team India) कसोटी संघातून बाहेर असलेला अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) दुलीप ट्रॉफीमध्ये द्विशतक ठोकून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पश्चिम विभागाचे कर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेने उत्तर पूर्व विभागाविरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी द्विशतक झळकावले. रहाणे दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतून त्याला वगळण्यात आले होते. अजिंक्य रहाणेने यशस्वी जैस्वालसह दुसऱ्या विकेटसाठी 333 धावांची भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पश्चिम विभागाने पहिल्या डावात 2 बाद 590 धावा केल्या. रहाणे 264 चेंडूत 207 धावा करून नाबाद आहे. रहाणेने 18 चौकार आणि सहा षटकार मारले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now