CSK vs DC: आयपीएल 2024 च्या 61 व्या सामन्यात (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 5 (CSK Beat RR) विकेट्सने पराभव केला. चेन्नईने राजस्थान रॉयल्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर पाच गडी राखून पराभव केला. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर राजस्थानने 20 षटकात 5 गडी गमावून 141 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईने 10 चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य गाठले. या सामन्यापूर्वी धोनी या सामन्यानंतर निवृत्ती जाहीर करेल असे बोलले जात होते पण तसे झाले नाही. सामना संपल्यानंतर धोनीने त्याच्या चाहत्यांसाठी संपूर्ण मैदानात फेरफटका मारला. दुसरे म्हणजे, चेन्नईत संघाचा शेवटचा साखळी सामना खेळल्यानंतर सर्व खेळाडूंना सुवर्णपदके देण्यात आले. धोनी टेनिस रॅकेटने चेंडू चाहत्यांच्या दिशेने मारत होता. सर्व चाहते चेंडू मिळवण्यासाठी आतुर झाले.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)