IND vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या पराभवानंतर आता भारताला आणखी एक मोठा धक्का, आयसीसीने कारवाई करत भारतीय खेळाडूंना ठोठवला दंड
कोणत्याही संघाने दिलेल्या वेळेपूर्वी उशीरा षटक टाकल्यास खेळाडूंना दंड आकारला जातो. जर एखाद्या संघाने एक ओव्हर उशीरा टाकला तर खेळाडूंना मॅच फीच्या 5 टक्के दंड आकारला जातो आणि एक पॉइंट देखील कापला जातो.
ICC Imposed Fine on Team India: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघ जागतिक चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या पराभवानंतर आता भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सेंच्युरियन कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संथ षटके टाकली, त्यामुळे आयसीसीने संघाला दंड ठोठावला आहे. कोणत्याही संघाने दिलेल्या वेळेपूर्वी उशीरा षटक टाकल्यास खेळाडूंना दंड आकारला जातो. जर एखाद्या संघाने एक ओव्हर उशीरा टाकला तर खेळाडूंना मॅच फीच्या 5 टक्के दंड आकारला जातो आणि एक पॉइंट देखील कापला जातो. भारताने 2 षटके उशिराने टाकली, त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड आणि 2 गुण कापण्यात आले. त्यामुळे आयसीसीने सर्व खेळाडूंना मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावला आणि त्यासोबतच दोन महत्त्वाचे गुणही कापले गेले. त्यामुळे गुणतालिकेत भारताला मोठा फटका बसला आहे. (हे देखील वाचा: New Fast Bowler For Second Test: पहिल्या कसोटीत पराभवानंतर भारतीय संघात दाखल होणार घातक गोलंदाज, बीसीसीआयने दिली माहिती)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)