IND vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या पराभवानंतर आता भारताला आणखी एक मोठा धक्का, आयसीसीने कारवाई करत भारतीय खेळाडूंना ठोठवला दंड
सेंच्युरियन कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संथ षटके टाकली, त्यामुळे आयसीसीने संघाला दंड ठोठावला आहे. कोणत्याही संघाने दिलेल्या वेळेपूर्वी उशीरा षटक टाकल्यास खेळाडूंना दंड आकारला जातो. जर एखाद्या संघाने एक ओव्हर उशीरा टाकला तर खेळाडूंना मॅच फीच्या 5 टक्के दंड आकारला जातो आणि एक पॉइंट देखील कापला जातो.
ICC Imposed Fine on Team India: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघ जागतिक चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या पराभवानंतर आता भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सेंच्युरियन कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संथ षटके टाकली, त्यामुळे आयसीसीने संघाला दंड ठोठावला आहे. कोणत्याही संघाने दिलेल्या वेळेपूर्वी उशीरा षटक टाकल्यास खेळाडूंना दंड आकारला जातो. जर एखाद्या संघाने एक ओव्हर उशीरा टाकला तर खेळाडूंना मॅच फीच्या 5 टक्के दंड आकारला जातो आणि एक पॉइंट देखील कापला जातो. भारताने 2 षटके उशिराने टाकली, त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड आणि 2 गुण कापण्यात आले. त्यामुळे आयसीसीने सर्व खेळाडूंना मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावला आणि त्यासोबतच दोन महत्त्वाचे गुणही कापले गेले. त्यामुळे गुणतालिकेत भारताला मोठा फटका बसला आहे. (हे देखील वाचा: New Fast Bowler For Second Test: पहिल्या कसोटीत पराभवानंतर भारतीय संघात दाखल होणार घातक गोलंदाज, बीसीसीआयने दिली माहिती)
🚨 JUST IN: India have been penalised for slow over rate during the first #WTC25 Test against South Africa.
Details ⬇️https://t.co/dSqixki92Z
— ICC (@ICC) December 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2023 01:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

