Fans Troll Anushka Sharma: टीम इंडियाच्या पराभवानंतर अनुष्का शर्मा सोशल मीडियावर ट्रोल, चाहत्यांनी फटकारले

दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर खेळला गेला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा धावांनी पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले. मॅचच्या पाचव्या दिवशी टीम इंडिया उरलेल्या 280 रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली, पण टीम 63.3 ओव्हरमध्ये 234 रन्सवर गारद झाली.

Fans Troll Anushka Sharma: टीम इंडियाच्या पराभवानंतर अनुष्का शर्मा सोशल मीडियावर ट्रोल, चाहत्यांनी फटकारले
Anushka Sharma (Photo Credit - Twitter)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना (WTC Final 2023) टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर खेळला गेला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा धावांनी पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले. मॅचच्या पाचव्या दिवशी टीम इंडिया उरलेल्या 280 रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली, पण टीम 63.3 ओव्हरमध्ये 234 रन्सवर गारद झाली. भारताकडून विराट कोहली पहिल्या डावात 14 आणि दुसऱ्या डावात 49 धावा करून बाद झाला. दरम्यान, विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही (Anushaka Sharma) डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना पाहण्यासाठी इंग्लंडला पोहोचली होती. टीम इंडियाच्या पराभवानंतर सोशल मीडिया यूजर्सनी अनुष्का शर्माला जोरदार ट्रोल केले. अनुष्का शर्माबद्दल अनेक प्रकारचे ट्विट केले जात आहेत. अनुष्का शर्माचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2023 08:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).