GT vs CSK, IPL 2024 Live Score Update: सुदर्शननंतर शुभमननेही अर्धशतक झळकावले, गुजरातची धावसंख्या एकही विकेट न पडता 140 धावा पार
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघ 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने 11 पैकी केवळ 4 सामने जिंकले असून 7 सामने गमावले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ 8 गुणांसह गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे.
CSK vs GT, IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) शुक्रवारी आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे. प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे. चेन्नई सुपर किंग्जने 11 पैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 5 गमावले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघ 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने 11 पैकी केवळ 4 सामने जिंकले असून 7 सामने गमावले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ 8 गुणांसह गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. दरम्यान, चेन्नईने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्स संघाचा सलामीवीर साई सुदर्शन, शुभमन गिलनेही अवघ्या 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. गुजरात टायटन्स संघाचा स्कोअर 170/0.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)