Rassie van der Dussen Century: क्विंटन डी कॉकनंतर रॅसी व्हॅन डर ड्युसेननेही शतक झळकावले, दक्षिण आफ्रिका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने
वनडे विश्वचषकाच्या (ICC Cricket World Cup 2023) आजच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका (SA vs SL) आमनेसामने आहेत.
भारतात खेळल्या जात असलेल्या आयसीसी क्रिकेट वनडे विश्वचषकाच्या (ICC Cricket World Cup 2023) आजच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका (SA vs SL) आमनेसामने आहेत. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. हे मैदान फलंदाजांसाठी नेहमीच कठीण असते. या मैदानावर धावा काढणे कधीच सोपे नव्हते. त्यामुळेच या मैदानावर आतापर्यंत झालेल्या 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये संघांना केवळ दोनदाच 300 धावांचा टप्पा गाठता आला आहे. दरम्यान, नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर रॅसी व्हॅन डर डुसेनने अवघ्या 103 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची धावसंख्या 244/2 आहे.
HUNDRED BY RASSIE VAN DER DUSSEN....!!!
5th ODI century by Rassie - what an electrifying start it has been to his ODI career. He's averaging almost 60 now, a superstar! pic.twitter.com/dFnRnhSjHm
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 7, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2023 04:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

