Asia Cup 2022 स्पर्धेसाठी पात्र ठरल्यानंतर Hong Kong च्या खेळाडूंचा 'काला चष्मा' गाण्यावर जबरदस्त डान्स (Watch Video)

यापूर्वी, केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप केल्यानंतरही याच गाण्यावर नृत्य केले होते.

Photo Credit - Instagram

आशिया चषकाच्या पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात हॉंगकॉंगने आघाडीच्या दावेदार संयुक्त अरब अमिरातीचा पराभव केला. चार संघांच्या स्पर्धेत हाँगकाँग हा एकमेव संघ असा आहे की ज्याने एकही सामना गमावलेला नाही. संयुक्त अरब अमिराती, कुवेत आणि सिंगापूर यांचा पराभव करून संघ मुख्य ड्रॉमध्ये पात्र ठरला. आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरल्यानंतर हाँगकाँगच्या खेळाडूंनी मोठा आनंद साजरा केला. 'काला चष्मा' या भारतीय गाण्यावर संघातील खेळाडूंनी जोरदार नृत्य केले. सोशल मीडियावर हा व्हडिओ खुप व्हायरल होतोय. यापूर्वी, केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप केल्यानंतरही याच गाण्यावर नृत्य केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aizaz Khan (@aiizazkhan)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement