Women's Asia Cup Final: भारताने विक्रमी 7व्यांदा महिला आशिया जिंकल्यानंतर केला जबरदस्त जल्लोष, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
चषकासह टीम इंडिया एन्जॉय करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखालील भारतीय संघाने (Team India) शनिवारी सिल्हेतमध्ये नवा इतिहास रचला. या संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून (India Win a Womens Asia Cup 2022 Final) विक्रमी सातव्यांदा महिला आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय महिला संघानं जबरदस्त जल्लोष केला. चषकासह टीम इंडिया एन्जॉय करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आशिया चषक जिंकणाऱ्या टीम इंडियावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. आजी-माजी क्रिकेटपटूसह नेटकऱ्यांनाही महिला संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)