Team India T20I Captain: चेतन शर्मानंतर आता रोहित शर्मा बीसीसीआयच्या निशाण्यावर? हार्दिक पांड्या होवू शकतो टी-20 चा कायम कर्णधार!
यासोबतच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आता रडारवर आहे.
टी-20 विश्वचषकात टीम इंडियाच्या उपांत्य फेरीतील पराभवामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) देखील अॅक्शन मोडमध्ये आले आहे. शुक्रवारी रात्री मोठा निर्णय घेत बोर्डाने चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती बरखास्त केली. यासोबतच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आता रडारवर आहे, ज्यांच्याकडून टी-20 आंतरराष्ट्रीय संघाचे कर्णधारपद कायचे जावु शकते असे समोर येत आहेत. मात्र, सध्याच्या न्यूझीलंड दौऱ्यावर रोहितला विश्रांती देण्यास सांगून हार्दिकला (Hardik Pandya) कर्णधार बनवण्यात आले आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय विभाजित कर्णधारपदावर विचार करत आहे, त्यानुसार हार्दिक पांड्याला लवकरच टी-20 आंतरराष्ट्रीय संघाचा नियमित कर्णधार म्हणून घोषित केले जाऊ शकते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)